विकास दुबेच्या एन्काउंटरवर निघणार चित्रपट, ‘हा’ अभिनेता साकारू शकतो विकास दुबेची भुमिका…
उत्तर प्रदेशातील कुख्यात विकास दुबे याचा आज पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. यामध्ये दुबे याचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात या एन्काउंटर बाबत बॉलिवूड मध्ये चित्रपट बनवण्याबाबत विचार करु लागले आहेत. प्रोड्युसर संदिप कपूर यांनी ट्वीट करत असं म्हटलं आहे..विकास दुबे याच्या एन्काउंटर संबंधित चित्रपट बनवल्यास त्यामध्ये अभिनेता मनोज वायपेयी मुख्य भुमिका साकारु शकतो. तसेच याबाबत आता बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
आज विकास दुबे याचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर हे प्रकरण विविध अँगलच्या माध्यमातून पाहिले जात आहे. काही जणांनी या प्रकरणाला राजकिय संबंधासोबत सुद्धा जोडले आहे. परंतु दुबे याचा एकूणच एन्काउंटर हा चित्रपटातील एखाद्या नाट्यमयाचा भाग असल्याचे दिसून आले.तर संदिप कौर याने ट्वीट करत असे पुढे असे म्हटले आहे की, मनोज वाजपेयी जर तु विकास दुबेची भुमिका साकारली तर कसे वाटेल? तु तर कमालच करशील.
मात्र यावर मनोज वाजपेयी याने ही बातमी चुकीची असल्याचं ट्वीट करत हे स्पष्ट केलं आहे.