वरुण-श्रद्धा झाले ‘स्ट्रीट डान्सर’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/varun-dhawan-759.jpg)
कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा याने डान्सवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीवर आणले. ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’नंतर आता त्याचा तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट येत आहे. यामध्ये पुन्हा एकदा अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील दोघांचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
रेमोने एका रिअॅलिटी शोदरम्यान या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हाच या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. ‘स्ट्रीट डान्सर’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.
वरुणसोबतच श्रद्धाचीदेखील महत्वाची भूमिका असल्यामुळे ती सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. प्रशांत शिंदे आणि तानिया यांच्याकडून श्रद्धा नृत्याचे धडे गिरवत आहे. प्रशांत आणि तानियाकडून श्रद्धा वेगवेगळे ५ नृत्यप्रकार शिकत आहे. ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे.