breaking-newsमनोरंजन
ल्लिका ‘कान्स’मध्ये पिंजऱ्यात कैद होते तेव्हा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/mallika-sherawat1.jpg)
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८’ मध्ये बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी सहभागी होत आपला जलवा दाखविला. मल्लिका शेरावतने कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. मल्लिकाने कान्समधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यामध्ये ती एका पिंजऱ्यात कैद असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मल्लिका जगभरातील लोकांना संदेश देताना दिसत आहे.
लहान मुलांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविले जावेत हा संदेश देण्यासाठीच मल्लिकाने स्वत:ला पिंजऱ्यात कैद केले. तिने ‘लॉक-मी-अप’ या कॅम्पेनचा भाग बनून चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रोस्टिट्यूशन विरोधात आवाज उठविला. या मुद्द्यावर जगभरातील लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी होऊच शकत नाही, असे म्हणत मल्लिकाने स्वत:ला पिंजऱ्यात कैद करून काही फोटो काढले.