‘लंडन कॉन्फिडेंशियल’चा टिझर प्रदर्शित; 18 सप्टेंबरला होणार रिलीज!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/646984968.jpg)
मुंबई – व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे ‘लंडन कॉन्फिडेंशल’ची घोषणा झी 5 ने केली असून या महामारीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक अनोखी सिचुएशनल स्पाई-थ्रिलर फ्रैंचाइज़ी असणार आहे. भारताचे सर्वात प्रसिद्ध गुन्हे लेखक एस हुसेन जैदी यांच्या द्वारे रचित या चित्रपटाचा प्रीमियर झी 5 वर 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज त्याचा आकर्षक टिझर प्रसिद्ध झाला.
हा टीझर लंडनच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला असून यामध्ये मौनी रॉय, पूरब खोली आणि कुलराज रंधावा हे गुप्तहेर एजंट म्हणून दिसणार आहेत. टाइम बॉम्बसारखे स्फोट करण्यासाठी डिझाइन केलेले, संसर्ग पसरवण्याच्या कल्पनेमागील स्त्रोत शोधण्याभोवती ही कथा फिरते.
एस हुसेन झैदी यांच्या द्वारे रचित या चित्रपटात मौनी रॉय आणि पूरब कोहली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. याशिवाय कुलराज रंधावा, सागर आर्य, परवेश राणा, जस बिनाग, दिलजोन सिंग आणि किरेन जोगी यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. चित्रपटाची निर्मिती अजय जी राय आणि मोहित छाब्रा यांनी केली असून दिग्दर्शन कंवल सेठी यांनी केले आहे.