breaking-newsमनोरंजन

राजू हिरानी बनविणार “3 इडियट’चा सिक्वल

बॉलीवूड बॉक्‍स ऑफीसवर 2009 साली आमिर खानचा “3 इडियट’ हा सर्वात हिट चित्रपट ठरला होता. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ वर्ष उलटली तरी अजूनही प्रेक्षकांचा तो सर्वात आवडता चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने भारतीय शिक्षण पद्धतीची दुखरी बाजू मांडली होती.

या चित्रपटात आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन, बमन इराणी, करिना कपूर अशी तगडी स्टारकास्ट होती. अनेक विक्रमही या चित्रपटाने मोडले होते. आमिर याच चित्रपटामुळे चीनी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. आता या चित्रपटाचा लवकरच सिक्वल येणार असल्याचे राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले.

राजकुमार “मुन्ना भाई चले अमरिका’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच “3 इडियट’ च्या सिक्वलवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. “3 इडियट चा सिक्वल यावा, अशी माझी इच्छा आहे. लेखक अभिजित जोशी या चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहेत. कथानक जेव्हा पूर्णत्त्वास येईल त्यानंतर लगेच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होईल, असे हिरानी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button