रणवीर सिंहसोबत काम करण्यास उत्सूक – रणबीर कपूर
रणबीर कपूर याने एका मुलाखतीत सांगितले की, रणवीर सिंहसोबत मी काम करण्यास खूप उत्सूक आहे. आतापर्यत रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांना एकत्रित काम करण्याची संधी मिळालेली नाही. प्रसिद्धीच्या काळात प्रत्येक सुपरस्टारने स्क्रीन शेयर केली आहे. मात्र, आतापर्यत या दोघा स्टारबाबत असे घडलेले नाही.
रणबीर म्हणाला, दोन सुपरस्टार कलाकारांना एकत्रित कास्ट करणे तसे खूपच कठीण काम आहे. कारण दोघांनाही चित्रपटाची कथा आणि स्क्रिप्ट आवडली पाहिजे. वास्तविक मी त्याच्यासोबत (रणवीर सिंह) काम करण्यासाठी खूप उत्सूक आहे. कारण मीही त्याचा एक चाहता आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “पद्मावत’ चित्रपटातील रणवीरचा अभिनयही उत्कृष्ट होता. तसेच तो कोणतीही जाहीरात ही पूर्ण क्षमतेने साकारतो. त्यातून त्याचे टॅलेंट स्पष्टपणे दिसून येते.
यासाठीच मी त्याच्यासोबत एक चित्रपट करू इच्छितो. मात्र, त्याच्या चांगल्या चित्रपटाची आवश्यकता आहे.
दरम्यान, संजय दत्तच्या बायॉपिक “संजू’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक आणि अभियनाची खूपच प्रशंसा होत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. रणबीरचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कामगीरी करू न शकल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.