‘येरे येरे पावसा’ने पटकावले सहा पुरस्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/yere-yere-pausa-marathi-film.jpg)
पहिल्या पावसाचा आनंद घ्यायाला सर्वजन तयारच असतात. पाऊस आला की अनेक लहान मुलांच्या ओठी ‘येरे येरे पावसा,तुला देतो पैसा’ हे गाणं येत. प्रत्येकासाठी पावसाची संकल्पना वेगवेगळी असतात. याच पावसावर आधारित ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे.
‘हॉलिवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२०’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, सहाय्यक अभिनेता, संकलन आणि साउंड डिझायनिंग या विभागासाठी या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत. ‘हॉलिवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२०’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ला १३ नामांकने मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाने तब्बल ६ पुरस्कार पटकावत बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
दरम्यान, पावसाची धमाल आणि लहानांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. पावसाचं आगमन जसं प्रत्येकाला सुखावणार असतं तसा हा चित्रपटही प्रत्येकाच्या मनाला एक वेगळी उभारी देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शिका शफक खान यांनी व्यक्त केला आहे.