breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

मला न्यूझीलंडला जाऊन राहायचंय – केदार शिंदे

मुंबई | भारतात दिवसागणिक भयावह होत चाललेल्या करोनाच्या परिस्थितीवरून प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यानं केंद्र सरकारवर तिरकस टीका केली आहे. ‘मला न्यूझीलंडला जाऊन राहायचं आहे. मागच्या १०० दिवसांत तिथं एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही,’ असं त्यानं म्हटलं आहे.

भारतात करोनाचा संसर्ग वाढतच असून एकूण बाधितांचा आकडा आजघडीला साडे बावीस लाखांच्याही पुढं गेला आहे. तर, ४५ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगातील इतर देशांनी मात्र करोनावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे. जेसिंडा अॅर्डन या महिला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली करोनाशी लढणाऱ्या न्यूझीलंडनं उल्लेखनीय करोनाला हद्दपार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ मे रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. तेव्हापासून मागच्या १०० दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

याच अनुषंगानं केदार शिंदे यानं ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मला न्यूझीलंडमध्ये जाऊन राहायचयं. त्यांना कसं शक्य झालं माहीत नाही पण, गेल्या १०० दिवसांत तिथे एकही करोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. न्यूझीलंडमध्ये महिला पंतप्रधान आहे. तिथे देवी जागृत आहे. आम्ही इथे फक्त ‘बेटी पढाव, बेटी जगाव’चे फतवेच काढत राहणार,’ अशी बोचरी टीकाही केदारने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button