मदतीचा हात पुढे करण्यात अमिताभ बच्चन गप्प का ?नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला बिग बींनी दिलं उत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-334.png)
कोरोना विषाणूच्या लढाईमध्ये अनेकांनी मदतीचा हात दिला आहे… तर काहीजण रोजंदारी कामगारांच्या मदतीला धावले. अशातच अमिताभ बच्चन गप्प का आहेत, असा सवाल नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केला. नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला महानायकाने उत्तर दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर चार ओळी पोस्ट करत बिग बींनी नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे.यात त्यांंनी म्हटलं की ‘एकाने दिलं आणि म्हटलं की दिलं.. दुसऱ्याने दिलं पण म्हटलं नाही की दिलं…मला दुसऱ्या श्रेणीतच राहू द्या…ज्यांना मदत मिळाली त्यांना कुठे माहित की कोणी दिलं? त्यांची फक्त करुण कहाणी समजून घ्या. अशा परिस्थितीत आणखी काय म्हणावं…जे मला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की मी मितभाषी आहे,’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-63.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/2-9.png)
आर्थिक मदत केल्यानंतर त्याचा गाजावाजा करणं आवडत नाही असं बिग बींनी या ओळींतून स्पष्ट केलं. बिग बींनी लिहिलेल्या या ओळींची सोशल मीडियावर फार प्रशंसा होत आहे.