breaking-newsमनोरंजन

भूषण कडू ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर !

‘बिग बॉस’ मराठीच्या घरात रोजच काही तरी नवीन घडत आहे. यामध्ये ज्या सदस्याला कमी मते मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य असते. या आठवड्यामध्ये भूषण कडूला घराबाहेर जावे लागणार आहे.

 

‘बिग बॉस’चा हा आठवडा सरप्राईझेस देणारा ठरला. सदस्यांना एक नव्हे तर दोन सरप्राईझेस मिळाली. घरामध्ये राजेश शृंगारपूरे, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी यांना पाठविण्यात आले. यांनी प्रत्येक सदस्यांना आपल्या मनामध्ये काय आहे? सदस्य कसे खेळत आहेत? आणि त्यांनी कसे खेळले पाहिजे याचे सल्ले दिले. ‘फादर्स डे’ निमित्त प्रत्येक सदस्यांनी आपल्या वडिलांबद्दल असणाऱ्या मनातील भावना व्यक्त केल्या. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल हे बघणे रंजक असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button