बॉलीवुडमध्ये फेसबुकचा “शहंशाह’ बनले अमिताभ बच्चन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amitabh-bachchan1.jpg)
बॉलीलुवडमधील बीग बी अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या 75 वर्षातही चित्रपटात दमदार भूमिका साकारत असताना त्यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह राहणारे बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या फॉलोवर्सची लिस्ट लांब लचक आहे. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर बिग बी यांचा वेगळाच जलवा आहे. अमिताभ बच्चन यांच्या फेसबुकवरील फॉलोअर्सने तब्बल 30 मिलियनचा (3 कोटी) आकडा पार केला आहे.
याबाबत अमिताभ बच्चन यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी काही मजेशीर फोटोसह 2007 च्या पोस्टद्वारे लिहिले की, फेसबुकवर 30 मिलियन फॉलोअर्स, आपल्या सर्वांचे सप्रेम आभार! 30 मिलियन फॉलोअर्स “यो’. अमिताभ यांचे ट्विटरवर 34 मिलियमहून (3.4 कोटी) अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच इंस्टाग्रामवर 8 मिलियन (80) फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर यांची जोडीचा “नॉट आऊट 102′ हा चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला आहे. ही जोडी सर्वप्रथम 1976 मध्ये “कभी कभी’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर 1991मध्ये प्रदर्शीत झालेल्या “अजूबा’ चित्रपटात दोघांनी एकत्रित काम केले होते.