बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली, मुलाला दिला जन्म
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/अमृता-राव.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिने रविवारी गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे तिच्यासह तिचा नवरा आरजे अनमोल याचा आनंद सध्या गगनात मावत नाहीए. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूतीच्या काळात अमृता रावसोबत पती अनमोलदेखील ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होता. दरम्यान, सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
अमृताला काही दिवसांपूर्वी खारमधील एका क्लिनिकच्या बाहेर पाहण्यात आले होते, तेव्हा ती गरोदर असल्याची खुशखबर सर्वांना मिळाली. त्यानंतर अमृताने नवरात्रीदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती आनंदाने बेबी बंप दाखवताना दिसत होती. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले होते, ‘नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये नववा महिना सुरू असल्याचा मला आनंद आहे.’
दरम्यान, अमृता आणि अनमोलने सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी लग्नही अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत केलं. घरातील मोजके सदस्य आणि मित्र- मैत्रिणीच त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर आता या स्टार कपलने गुड न्यूज दिली.