breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूडला पुन्हा एकदा मोठा धक्का,प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

2020  हे वर्षात अनेक अनेपेक्षित घटना घडालायला सुरवा झाली..त्यातली पहिली आणि ज्यानं संपूर्ण जगच हादरून टाकलं अशी घटना म्हणजे सध्या जगभर थैमान घातलेलं कोरोना. त्याचप्रमाणे हे वर्ष बॉलिवूडसाठी सुद्धा तितकच  वाईट ठरलं आहे.  बॉलिवूडमधून एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. इरफान खान, ऋषी कपूर,  वाजिद खान आणि गीतकार अनवर सागर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना गमावल्यानंतर बॉलिवूडला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन मुंबईत निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अशोक पंडित यांनी बासू चॅटर्जी यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर दिली आहे. ,” मला सांगताना अत्यंत खेद होत आहे की महान दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दुपारी 2वाजता सांताक्रुझ स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. आम्हाला तुमची आठवण येईल सर.” असं त्यांनी ट्विट केलं आहे.

10 जानेवारी 1930 रोजी बासू चटर्जी यांचा जन्म झाला. सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में यांसारखे सुंदर चित्रपट दिले. चित्रपटांत विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button