breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकावर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्याचं दिसत आहे. बिहार पोलिसांनी वेगाने सूत्रं हलवत तपासाला सुरुवात केली आहे. यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक थेट मुंबईतही दाखल झालेलं आहे. मात्र, आता या पथकांला मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात पकडलं आहे. मुंबई पोलिसांनी या पथकाला नियम दाखवत मुंबईत तपासाआधी स्थानिक समन्वयक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. तसेच याची खबरदारी घेण्याची समज दिली आहे.

मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल कायदेशीर समज दिलेली आहे. परराज्यातून येणाऱ्या पोलिसांनी मुंबईत आल्यावर आधी मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची परवानगी घेण्याचा नियम आहे. त्यांना कोणत्या गुन्ह्याचा, काय तपास करायचा आहे हे सांगावं लागतं. व त्यासाठी तसा रितसर अर्ज करावा लागतो आहे.

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात

दुसऱ्या बाजूला सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीसही करत आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. या कलमाखाली बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासही सुरु केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झालेली आहे. बिहार पोलिसांचा तपासाचा धडाका सुरु असल्याने मुंबई पोलीस अडचणीत आले होते. यामुळे आता मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यास सुरुवात केलेली आहे.

बिहार पोलीस मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना भेटायला आले. त्यावेळी बिहार पोलिसांना अनेक तास ताटकळत बसवण्यात आलं होत. त्यानंतर त्यांना माध्यमांशी देखील बोलू देण्यात आलेलं नाहीय. माध्यमांच्या गराड्यातून काढताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होत आहे. यानंतर बिहार पोलिसांना घेऊन मुंबई पोलिसांची गाडी दूर निघून गेलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button