breaking-newsमनोरंजन
बिग बॉसचं घर झालं पाळणा घर
बिग बॉसनं घरातील सदस्यांना ‘बाबा गाडी घराबाहेर काढी’ हा नॉमिनेशन टास्क दिला. या टास्कमध्ये घरातील सर्व सदस्यांना बेबीसीटरची भूमिका साकारायची आहे. घरामध्ये आलेले नवे सदस्य त्यागराज, शर्मिष्ठा आणि घराची कॅप्टन मेघा या प्रक्रियेपासून सुरक्षित आहेत.
बिग बॉसचं घर पाळणा घर झाल्याचं पाहायला मिळालं. या टास्क अंतर्गत घरातील गार्डन एरियाचं पाळणा घरात रुपांतर करण्यात आलं आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एक बाबा गाडी देण्यात आली आहे. यामध्ये असलेल्या बाहुली भोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगणार आहे. या टास्कमधील बेबीसीटर्सना त्यांना दिलेल्या बाहुल्या सांभाळायच्या आहेत. या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण नॉमिनेट होणार? कोण सुरक्षित होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.