breaking-newsमनोरंजन

बिग बींनी आमिरला दिला नवा कानमंत्र…

अभिनेता आमिर खान सध्या पाणी फाऊंडेशद्वारे दुष्काळग्रस्त भागात जाऊन मदतीचा हात पुढे करत आहे. असं असलं तरीही त्याने आगामी चित्रपटांकडे दुर्लक्ष केलं नाहीये. सध्या तो ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणार आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बींनी आमिरला एक कानमंत्र दिला आहे. कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करत असताना चित्रपटाच्या संपूर्ण टिमने एकत्र मिळून काम केले पाहिजे. चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, चित्रपटातील कलाकार यांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र रहायला पाहिजे. असे केले तरच प्रत्येक चित्रपट यशस्वी होतोच, असे बिग बी म्हणतात, असे आमीरने सांगितले. ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button