बापरे! पहिल्या वेब सीरिजसाठी अक्षयने घेतले इतके मानधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Akshay_Kumar.jpg)
डिजीटल प्लॅटफॉर्मचं वाढतं महत्त्व आणि वेब सीरिजची वाढती क्रेझ पाहता वेब विश्वात मोठमोठे कलाकार येऊ लागले आहेत. या वेब विश्वात नुकतंच एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अॅमेझॉन प्राइमद्वारे तो डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे. आपल्या या पहिल्यावहिल्या वेब सीरिजसाठी त्याने घेतलेल्या मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षयने त्याच्या अटी-शर्तींवर ही वेब सीरिज साइन केली आहे. त्यामुळे त्याने मागितलेली रक्कमसुद्धा निर्मात्यांनी मान्य केली. या वेब सीरिजसाठी त्याने थोडे थोडके नाही तर तब्बल ९० कोटी रुपये घेतल्याचं कळतंय.
अॅमेझॉन प्राइम ओरिजीनलच्या ‘द एंड’ या सीरिजद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलरने परिपूर्ण अशी ही सीरिज असणार आहे. ‘ही अत्यंत मजेशीर आणि काल्पनिक कथा आहे. याबद्दल मी सध्या फार काही सांगू शकत नाही पण त्यात प्रेक्षकांना खूप सारं अॅक्शन पाहायला मिळणार हे नक्की,’ असं अक्षयने याविषयी सांगितलं. डिजीटल विश्वात पदार्पण करण्याविषयी तो पुढे म्हणाला, ‘मला माझ्या मुलाकडून याबाबत प्रेरणा मिळाली. तरुणांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. त्यानेच मला डिजीटल प्लॅटफॉर्मवर येण्यास प्रोत्साहित केलं.’