प्रियांका चोप्रा फेसबुकची मोस्ट “एंगेजिंग सेलिब्रिटी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/priyanka-chopra-.jpg)
बॉलीवुडची देशी गर्ल आणि ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्राने जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. पण ती त्यासोबतच भारतावरही आपली हुकूमत गाजवत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा मोस्ट “एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ बनली आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, प्रियंका 100 गुणांसह फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली असून लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने दिलेली आहे. बिग बी नुकतेच फेसबुकवर मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी झाले होते. हा विषय त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला होता.
स्कोर ट्रेंड्सनी काढलेल्या मोस्ट एंगेजिंग फिमेल सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रानंतर 96 गुणांसह अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानी आहे. तर धकधक गर्ल माधुरी दीक्षित “बकेट लिस्ट’ चित्रपटामुळे या लिस्टमध्ये 62 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. माधुरीनंतर मोस्ट एंगेजिंग फिमेल सेलिब्रिटीच्या यादीत सनी लिओन चौथ्या, तर कॅटरीन कैफ पाचव्या स्थानी आहे.
दरम्यान, प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वी एका शाही लग्नसोहळ्याला उपस्थितीत होती. तसेच बांग्लादेशातील रोहिंग्याच्या मुलांची तिने भेट घेतली होती. या दोन्ही गोष्टींमुळे प्रियंका चर्चेत असल्याने तिने पहिला क्रमांक मिळविल्याचे बोलले जात आहे.