Breaking-newsमनोरंजन
प्रियांकानी साजरी केली निक जोनससोबत पहिली दिवाळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/priyanka-chopra-nik-jonas-.jpg)
पूर्ण देशभरामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये सुद्धा क्रेज पाहायला मिळत आहे. खासकर बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा हिने अमेरिकेमध्ये जोनास फॅमिलीसोबत दिवाळी साजरी केली. लग्नानंतरची प्रियांकाची ही पहिलीच दिवाळी आहे. यानिमित्ताने प्रियांका चोपडाने आपल्या फॅमिलीसोबत मिळून घर सजवले आहे. दिवाळीचे काही फोटोही प्रियांका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्रियांका आपल्या सहपरिवारासोबत बसलेली दिसत आहे. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.