breaking-newsमनोरंजन

परिणीती चोप्रा अडकणार विवाह बंधनात

बॉलीवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच विवाहबंधनात अडकली असून त्यानंतर आता परिणीती चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. परिणीती सध्या चरित देसाईसोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समजते.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा या महिन्याच्या प्रारंभीच शाहीसोहळा संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमात प्रियांकाची बहिण आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीतीही उत्साहाने वावरताना दिसली होती. यावरून प्रियांकाच्या लग्नावेळी ती आपल्या लग्नाचीच पूर्वतयारी करत असल्याचे वाटते.

अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करणारे परिणीती आणि चरित देसाई लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात. प्रियांकाच्या प्री-वेडिंग फंक्‍शनवेळी दोघेजण एकत्रित दिसले होते. या फंक्‍शनचे फोटो शेअर करत प्रियांकाने “फ्रेंड्‌स…फैमिली…’ असे म्हटले होते. तसेच जोधपुर येथे झालेल्या कार्यक्रमाला चरित देसाईही उपस्थित होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button