breaking-newsमनोरंजन

पत्नीच्या निधनानंतर राहुल देव या मराठी मुलीला करतोय डेट, त्याच्यापेक्षा आहे 14 वर्षांनी लहान

मुग्धा गोडसे आणि राहुल देव गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रमात देखील एकत्र पाहाण्यात येते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सोशल मीडियावर देखील ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. राहुल देवचे पहिले लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. राहुलचे पहिले लग्न रिनासोबत झाले होते. रिनाचे 2009 मध्ये कर्करोगाने निधन झाले. रिनाच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचा राहुलने एकट्यानेच सांभाळ केला आहे.

https://www.instagram.com/p/B9jgKjfpZpT/?utm_source=ig_embed

मुग्धा आणि राहुलने त्यांच्या नात्याविषयी कधीच मीडियापासून लपवले नाही. ते दोघे पॉवर कपल या कार्यक्रमात देखील झळकले होते. राहुल आणि मुग्धा यांच्यात 14 वर्षांचे अंतर असून या गोष्टीची नेहमीच चर्चा मीडियात रंगते. पण याबाबत या दोघांनीही मौन राखणेच पसंत केले होते. पण आता पहिल्यांदाच राहुलने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.instagram.com/p/B8ieQoEJ9ZB/?utm_source=ig_embed

राहुल 51 वर्षांचा आहे तर मुग्धा त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात 2013 मध्ये झाली होती. त्यांच्या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले आणि गेल्या पाच वर्षांपासून ते दोघे नात्यात आहेत. त्यांच्या नात्याविषयी राहुलने सांगितले आहे की, माझ्या आई-वडिलांमध्ये देखील दहा वर्षांचे अंतर होते. त्यामुळे माझ्यातील आणि मुग्धा मधील असलेल्या वयाच्या अंतराचा मी कधीही विचार करत नाही.

https://www.instagram.com/p/B4JlmanJN-1/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button