नोरा फतेहीने वाढवली मानधनाची रक्कम…
नोरा फतेही अलिकडे काही काळापासून खूप चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या “दिलबर’ गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये नोराने आपले डान्स स्कील दाखवून दिले आहे. जॉन अब्राहमच्या “सत्यमेव जयते’मधील हे गाणे सध्या खूप हिट चालले आहे. या गाण्याच्या व्हिडीओला आतापर्यंत 20 मिलीयन लोकांनी आतापर्यंत बघितले आहे.
ट्विटरवर हे गाणे रिलीज झाल्यापासून 24 तासातच हे गाणे टॉप ट्रेंडमध्ये आले आहे. या गाण्यामुळे नोरची डिमांड एवढी वाढली की तिला अन्य काही निर्माते अशाच गाण्यासाठी येऊन भेटायला लागले आहेत. नोराला आताच सलमान खानच्या मल्टिस्टार “भारत’मध्येही कास्ट केले गेले आहे.
सलमानच्या छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये “तितली’फेम शशांक सनी अरोरा साकारणार आहे. त्याशिवाय तब्बू, दिशा पटणी आणि सुनिल ग्रोवर देखील छोटे मोठे रोल साकारणार आहेत. आता या सगळ्याचा अर्थपूर्ण फायदा करून घेण्यासाठी नोरा फतेहीने आपली मानधनाची रक्कम एकदम वाढवून टाकली आहे. नोराला नक्की काय रोल दिला गेला आहे, हे समजू शकलेले नाही. पण “दिलबर’सारखाच एखादा डान्स नंबर ती करणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी दोन सिनेमांमध्येही ती आयटम सॉंग साकारणार आहे.