नेहा पेंडसे बिग बॉगसच्या घरात परतणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/neha-pendse-759.jpg)
अभिनेत्री नेहा पेंडसेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आता दोन आठवडे होतील. मात्र तिच्या नावाची चर्चा अजूनही कायम आहे. विजेतीपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नेहाची बिग बॉगच्या घरातील एक्झिट अनेकांना पटली नाही. तिची एक्झिट ही तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्काच होती. म्हणूनच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या नेहाला पुन्हा घरात प्रवेश द्यावा असं मत तिच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं होतं. त्यानंतर बिग बॉस नेहाला घरात पुन्हा प्रवेश देईल अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे. अजूनही बिग बॉसनं या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
सुरूवातीपासून स्वत:ला कोणत्याही वादात न ओढता सेफ गेम नेहानं खेळला. फक्त वाद घालून बिग बॉसच्या घरात टिकता येतं, या फंड्याला तिनं छेद दिला. तिची बिग बॉसच्या घरातली खेळी सर्वांनाच आवडली. अल्पावधीत तिनं प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणूनच तिला बिग बॉसनं आणखी एक संधी द्यावी असं तिच्या चाहत्यांनाही वाटत आहे. सध्या सोशल मीडियावर We Want Nehha Back या टॅगची चर्चा आहे. हा टॅग वापरत अनेकांनी तिला आणखी एक संधी देण्याची विनंती बिग बॉसकडे केली आहे.