breaking-newsमनोरंजन

नेहाला पाहून भान विसरला; ऑडिशनमध्येच केलं किस

सोनी वाहिनावरील ‘इंडियन आयडल’ पर्व ११ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशातील अनेक लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शोच्या मंचावर परफॉर्म करत आहेत. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. सध्या या शोचे ऑडिशन सुरु आहे. मात्र या ऑडिशन दरम्यान एका स्पर्धकाने जबरदस्ती नेहा कक्करचा किस घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ऑडिशमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान नेहा कक्करचा एक चाहता तिच्यासाठी काही गिफ्ट घेऊन शोच्या मंचावर येतो. तो एक-एक करुन नेहाला गिफ्ट देतो. ते पाहून नेहा आनंदी होते आणि त्या स्पर्धकाला मिठी मारते. अचानक तो स्पर्धक कोणताही विचार न करता नेहाच्या गलावर किस घेतो.

शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण स्पर्धकाला थांबवतो आणि नेहा देखील तेथून बाजूला होते. ते सर्व पाहून परीक्षक विशाल दादलानी आणि अनु मलिका देखील हैराण होतात. सध्या नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सर्वावर नेहाची काय प्रतिक्रिया आहे हे अजून समोर आलेले नाही.

‘इंडियन आयडल’ पर्व ११ च्या ऑडिशन व्हिडीओमध्ये स्पर्धकांची गाणी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. एक स्पर्धक तर त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला आहे. तर दुसरीकडे एका स्पर्धकाने तो आता पर्यंत काय काम करतो हे त्याच्या कुटुंबीयांना देखील सांगितलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button