breaking-newsमनोरंजन

नेटकऱ्याने तापसीला म्हटलं ‘वाईट अभिनेत्री’; तिचं उत्तर वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये तिने ज्याप्रकारे धाडसी भूमिका साकारल्या. त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यातही आपण हजरजबाबी, साहसी असल्याचं तापसीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. एका नेटकऱ्याने तापसीला ‘वाईट अभिनेत्री’ असल्याची टीका करत दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना त्यांच्या चित्रपटात काम न देण्याचं ट्विट केलं. यावर त्या नेटकऱ्याला तापसीने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. हे उत्तर वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल.

‘अनुभव सिन्हा सर, माझ्या मते तुम्ही तुमच्या आगामी चित्रपटात तापसीला घेऊ नये. कारण तिला अभिनय म्हणजे काय हेच माहीत नाही,’ असं ट्विट नेटकऱ्याने केलं. त्यावर तापसीने त्याला उत्तर देत म्हटलं, ‘सॉरी यार, आता तर सर्वकाही साइन आणि सील झालंय. आता तर सरांना मीच जाऊ देणार नाही. पण एक काम कर, पुढच्या चित्रपटासाठी रोखू शकलास तर बघ. कारण कदाचित त्यांच्यासोबत त्या चित्रपटातसुद्धा मीच काम करेन.’ या उत्तरासोबत तापसीने #TryAgain (पुन्हा प्रयत्न कर) हा हॅशटॅगसुद्धा लिहिला.

taapsee pannu

@taapsee

Cheers to the new beginning with some good food! This one is a subject way too close to my heart. I’ve been wanting to do this since years. It becomes exciting when it happens with the ‘Man of The Moment’ @anubhavsinha
8th March 2020 will surely be the day to watch out for !

View image on Twitter
८१ लोक याविषयी बोलत आहेत

taapsee pannu

@taapsee

Sorry yaar, ab toh sab kuch sign n seal ho chuka hai. Ab toh sir ko main hi nahi nikaalne dungi. But ek kaam karo, agli wali ke liye rok lo kyunki shayad woh bhi main lock karva lu jald hi. https://twitter.com/Virendr95094268/status/1147917515030274048 

Vishal@Virendr95094268
@taapsee @anubhavsinha यांना प्रत्युत्तर देत आहे

@anubhavsinha sir I think u should caste some other actress.Taapsee doesn’t knows acting.

६८८ लोक याविषयी बोलत आहेत

तापसीने अनुभव सिन्हा यांच्या ‘मुल्क’ चित्रपटात काम केलं आहे. हे दोघं पुन्हा एकदा सामाजिक चित्रपटात काम करणार असून ‘थप्पड’ असं त्याचं नाव असल्याचं कळतंय. या चित्रपटातसुद्धा तापसी सक्षम स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button