breaking-newsमनोरंजन

“द बिग बुल’मधील अभिषेक बच्चनचा लुक व्हायरल

बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन दिर्घ काळानंतर मोठया पडद्यावर “द बिग बुल’ चित्रपटातून वापसी करत आहे. हा चित्रपट 1990 ते 2000मध्ये घडलेल्या ख-या घटना आणि भारतातील आर्थिक क्षेत्रात झालेल्या बदलांवर आधारित आहे.
या चित्रपटातील अभिषेक बच्चनचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अभिषेक सूट आणि सनग्लासेसमध्ये खुपच हॅण्डसम दिसत आहे. विशेष म्हणजे यात अभिषेक बच्चनला मिशा असल्याचे दिसून येते.

यात अभिषेकच्या ऑपोझिट इलियाना डिक्रूजला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.”द बिग बुल’ चित्रपट अजय देवगण आणि आनंद पंडित प्रड्यूस करत असून कुकी गुलाटी हे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी गुलाटी यांनी विवेक ओबेरॉयाच्या “प्रिंस’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

दरम्यान, हा चित्रपट स्टॉकब्रोकर हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित आहे. हर्षद मेहताला कोटयवधीचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा घोटाळा 1992मध्ये उघडकीस आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button