दीपिकाच्या मानेवरचा टॅटू गायब
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Deepika-Padukone-Vogue-India-.jpg)
कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सहभागी झाली असून या फेस्टिव्हलमध्ये ती वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसली. कधी पर्पल पेंटसूट, तर कधी पर्पल जीन्स आणि व्हाईट टीशर्टमध्ये दिसली. तिचा कान्समधील प्रत्येक अंदाज प्रेक्षकांसाठी काही खास आणि निराळा होता. दीपिकाने शुक्रवारी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी पिंक परी बनून ती रेड कार्पेटवर अवतरली. सुंदर दिसण्यावर आणि सुंदर ड्रेसवर भाळणाऱ्या चाहत्यांचे लक्ष दीपिकाच्या मानेवरील टॅटूवर गेले आणि चाहत्यांना धक्काच बसला.
दीपिका आणि रणबीर कपूर खूप काळ रिलेशनशीपमध्ये होते आणि त्याचदरम्यान आपल्या मानेवर दीपिकाने आरके असा रणबीर कपूरच्या इनिशियल्सचा टॅटू गोंदवला. पण दोघांमध्ये कालांतराने दूरावा निर्माण झाला. तरी देखील हा टॅटू कायम होता. दोघांनी ब्रेकअपनंतर तमाशा, ये जवानी है दिवानी यासारख्या चित्रपटात काम केले. पण तिच्या मानेवरील टॅटू कान्स फेस्टिवलमध्ये गायब झालेला दिसत असल्यामुळे पुन्हा चर्चांना ऊत आला आहे. टॅटू गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एका साबण्याच्या जाहिरातीतही साडी नेसलेल्या दीपिकाच्या मानेवर टॅटू मात्र दिसत नाही. टॅटू मेकअपने लपवण्यात आल्याचे बोलले जाते.