“तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन”; रिया चक्रवर्तीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला. मात्र अजूनी त्याचे फॅन्स त्याला विसरलेले नाही. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. आता रियाने आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला आहे. रियाने सुशांतसोबतचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीच पोस्ट केलं नव्हतं. परंतु, व्हॉट्सॅपवर तिने सुशांतसोबत आपला डिस्प्ले फोटो ठेवला आहे. तसंच तिने इन्स्टाग्रामवर देखील त्यांच्या दोघांचा फोटो पोस्ट करत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,
“मी आताही माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तूच तो व्यक्ती आहेस, ज्याने मला प्रेमात विश्वास दिला आणि प्रेमाची जाणिव करून दिलीस. तूच मला शिकवलसं की, कसं एखादं सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकतं. मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक दिवस शिकली आहे. मला माहिती आहे की, तू सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. चंद्र, तारे, गॅलेक्सी या सर्वांनी मोकळ्या मनाने एका भौतिकशात्र तज्ज्ञाचं स्वागत केलं असणार. तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार, आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावं. तू एक उत्तम व्यक्तीमत्त्व असणारा व्यक्ती होतास, ज्याला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे आणि तू सुद्धा हेच सांगायचास की, आपलं प्रेम वेगळं आहे. तू सारं काही मोकळ्या मनाने करू शकतेस. आणि आता तू हेसुद्धा दाखवून दिलसं की, आपलं प्रेम एक इतरांसाठी उदाहरण आहे. तुला शांती मिळो सुशी, तुला गमावून आज 30 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.”

सुशांत सिंह राजपूत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत गेल्या एका वर्षापासून रिलेशनमध्ये होता. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही यावर्षाअखेरीस लग्न करणार होते. मात्र रिया चक्रवर्तीवरही सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात येत आहे. मात्र याबाबत अजून काही ठोस पुरावा मिळालेला नाही.अजूनही सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी चौकशीच सत्र हे सुरुच आहे.




