breaking-newsमनोरंजन

तामिळनाडुतील अभिनेत्रीचे सेक्‍स रॅकेट उघड

चेन्नाई – तामिळी चित्रपट सृष्टीत ख्यातनाम असलेल्या संगीता बालन नावाच्या अभिनेत्रीचे सेक्‍स रॅकेट उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. हे रॅकेट उघड झाल्याने तामिळी चित्रपट सृष्टीत खळबळ माजली आहे. शहराच्या ईस्ट कोस्ट रोडववरील रिसॉर्ट मध्ये हे रॅकेट चालवले जात होते. तेथे परराज्यातील अनेक मुली आढळून आल्या असून त्या सर्वांची तेथून सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

संगीता बालन ही आपल्या एका पार्टनर बरोबर हे रॅकेट चालवत होती. त्याच्यासह संगीताला अटक करून ईगमोर येथील कोर्टात हजर करण्यात आले. संगीत हिने 1996 मध्ये तामिळी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तिने काम करून मोठे नाव कमावले होते. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हे रॅकेट उघडकीला आणले. त्यांच्या रिसॉर्टवर छापा घालण्यात आला तेव्हा त्यांना तेथे तीन मुली आढळून आल्या. त्या खेरीजही अन्य अनेक मुली या रॅकेटशी संबंधीत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button