breaking-newsमनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची भूमिका साकारणार आहे. रश्मि रॉकेट असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. तसेच, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.
भारतातील एक वेग‌वान धावपट्टू रश्मी हिची कहाणी या चित्रपटात पाहता येणार आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला ‘रॉकेट’ म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. ​​
नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांच्याद्वारे ही कथा लिहिण्यात आलेली असून आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात ‘एक्सट्रैक्शन’ फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना तापसी म्हणाली की “मी या प्रॉजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. कोरोनाच्या अगदी आधी, मी एका स्प्रिंटरच्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल.”
देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता ‘रश्मि रॉकेट’मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाड़िया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला ‘रश्मि रॉकेट’ 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button