तापसीने साजरा केला मितालीचा वाढदिवस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/MITHALI-TAPSEE-FRAME.jpg)
क्रिकेटविषयी भारतात ज्यावेळी चर्चा केली जाते, तेव्हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि पुरुष संघाचा विषय रंगतो. पण एका महिला खेळाडूने मात्र भारतातील महिला क्रिकेटला आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वकौशल्याने वलय मिळवून दिले. भारतीय महिला क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या मिताली राज हिचा हा ३७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला आणि त्याचा फोटोही सोशल मिडिया वर शेअर केला.
मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ ला राजस्थानमधील जोधपूर शहरात झाला. यावेळी बॉलिवूडची ‘मिताली राज’ म्हणजेच तापसी पन्नू हिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तापसीने केवळ मितालीचे अभिनंदनच केले नाही, तर तिच्यासोबत तिचा वाढदिवसदेखील साजरा केला. तापसीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. महत्त्वाचे म्हणजे त्यातच तापसीने मितालीच्या बायोपिकची घोषणादेखील केली.