breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ लवकरच 200 कोटींच्या घरात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-93.png)
अजय देवगणचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ रिलीज होऊन 12 दिवस झाले. 12 व्या दिवशीही हा चित्रपट जबरदस्त चालतोय… ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-21.png)
रिलीजच्या 11 व्या दिवशी या चित्रपटाने 8.17 कोटींचा बिझनेस केला आणि काल 12 व्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली. यासोबतच ‘तान्हाजी’च्या एकूण कमाईचा आकडा 182 कोटींवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत अजयचा हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असे मानले जात आहे. या चित्रपटाचा बजेट 125 कोटी रूपये आहे. हा बजेट कधीच वसूल झाला आहे.
सुमारे 3500 स्क्रिन्सवर रिलीज झालेला ‘तान्हाजी’ ओम राऊतने दिग्दर्शित केला असून अजय देवगण व भूषण कुमार या दोघांची निर्मिती आहे.