तमिळ चित्रपटसृष्टीतील निर्माते स्वामीनाथन यांचे कोरोनाने निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/100820071259-5f314ee3b954dswaminathan-dies-collage.jpg)
चेन्नई | कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदौरी यांचे निधन झाले. आता तमिळ चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माते स्वामीनाथन यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
निर्माते स्वामीनाथन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर चेन्नई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मी मुव्ही मेकर्स या नावाने स्वामीनाथन यांचे प्रोडक्शन हाऊस असून गेल्या 20 वर्षांपासून ते या इंडस्ट्रीचा भाग होते.
स्वामीनाथन यांनी आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून गोकुलाथील सिथई, प्रियामुदन, भगवती, अनबे शिवम आणि पधुपेट्टई यांसारखे चित्रपट बनवले. तमिळ चित्रपटांचे निर्माते असण्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांत सपोर्टींग ऍक्टरची भूमिका बजावली आहे.