breaking-newsमनोरंजन
डोंबिवली फास्ट चित्रपटांचे दिग्दर्शक निशिकांत कामत रुग्णालयात
मुंबई – डोंबिवली फास्ट या मराठी लोकप्रिय चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पाय रोवणारे चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना प्रकृती बिघडल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताच्या विकाराचा त्रास जाणवत आहे. तो वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिग्दर्शक निशिकांत कामत यकृताच्या आजाराने त्रस्त होते. १० दिवसांपासून त्यांना या विकाराचा जास्त त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे, अशी माहिती मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली. कामत यांनी डोंबिवली फास्ट, दृश्यम, मुंबई मेरी जान, मदारी, फोर्स या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.