breaking-newsमनोरंजन

डेटिंग अ‍ॅपच्या मदतीने चाहत्याला गंडवलं, प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या अटकेत

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सुझी टेलर हिला जबरदस्तीने पैसे उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही आश्चर्यचकित करणारी घटना ब्रिस्बेन येथे घडली आहे. सुझीने टिंडर या डेटिंग अ‍ॅपच्या मदतीने एका व्यक्तिला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. दरम्यान त्याला मारहाण करुन तिने त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळले.

‘द ब्लॉक’ या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली सुजी टेलर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्लिल फोटो व वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी ही अभिनेत्री आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

प्रकरण काय आहे?

तिने ब्रिस्बेन येथील आपल्या राहत्या घरी एका व्यक्तिला शरीर सुखाचे आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते. हा व्यक्ति तिचा चाहता होता. दोघांची ओळख टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. घरी आल्यावर त्या व्यक्तिला तिने व तिच्या साथिदाराने एका खोलीत बंद केले. दरम्यान त्यांनी त्याला जबर मारहाण करत क्रेडिट कार्डच्या मदतीने त्याच्याकडून हजारो डॉलर्स उकळले. त्यानंतर तो पोलिसांकडे तक्रार करणार नाही, या एका अटीवर त्याला सोडून देण्यात आहे.

सुजीच्या तावडीतून सुटल्यानंतर या जखमी व्यक्तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सर्व प्रकरणाची नीट कसून चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी अपहरण करणे, खंडणी मागणे आणि प्राणघातक हल्ला करणे या आरोपांखाली सुझी टेलर व तिच्या साथीदाराला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button