ट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर
![Shilpa Shetty in Mumbai High Court against media! Hearing tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/shilpa-5.jpg)
अभिनेत्री शिल्पा शेटी हिने आपला मुलगा कियानचा नुकताच वाढदिवस साजरी केला. यानिमित्त शिल्पाने फक्त पार्टीच दिली नाही, तर त्यापूर्वी कियान आणि आपल्या आईसोबत एका वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथे फळ वाटप केले. याचा एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. शिल्पाने भलेही चांगल्या मनाने ही पोस्ट टाकली असेल. मात्र, सोशल मीडियावर काही जणांना ते न रुचल्याने त्यांनी शिल्पाला ट्रोल केले. या ट्रोल करणाऱ्यांना शिल्पाने सडेतोड उत्तर दिले.
शिल्पाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला एका सोशल मीडिया युजरने शिल्पाच्या या कृतीला पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत हा शो ऑफ करा, असे म्हटले. याला उत्तर देताना शिल्पाने म्हटले की, मोठी खेदाची बाब आहे की, तुम्हाला तसे वाटले.
तुमच्या माहितीसाठी वृद्धाश्रमात फळ वाटप केल्यानंतर आम्ही सर्वांना जेवनही दिले होते. मी हा व्हिडिओ फक्त यासाठी पोस्ट केला होता की, यामुळे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन अनेक जण वृद्धाश्रमाला भेट देतील आणि त्यांना मदत करतील. तसेच माझे पैरंट्स आम्हाला सतत येथे घेऊन येत असतात आणि मी ही माझ्या मुलाला येथे घेऊन आले. माझा शो ऑफ करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे म्हणत शिल्पाने सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर अनेकांनी शिल्पासह तिच्या मुलाला शुभेच्छा दिल्या.