breaking-newsमनोरंजन

झेब्रा एंटरटेन्मेंट करतंय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतरंड’ या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. झेब्रा एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत ते त्यांच्या नव्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.  झेब्रा एंटरटेन्मेंटअंतर्गत तयार करण्यात येणारा हा आगामी विनोदी चित्रपट असणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हा चित्रपट २०२०च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“आम्ही आमच्या निर्मिती संस्थेच्या स्थापनेनंतर ‘उतरंड’ या लघुपटाची निर्मिती केली. ‘उतरंड’ला विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाल्याने आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहोत. पदार्पणात एक निखळ मनोरंजनपर चित्रपट घेऊन येत आहोत,” असं झेब्रा एंटरटेन्मेंट प्रोडक्शन हाऊसचे निर्माते संजय गोळपकर यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button