breaking-newsमनोरंजन

जोधपूरमधील ‘या’ ठिकाणी वरुण- नताशा बांधणार लग्नगाठ ?

गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. विराट कोहली- अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण – रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा-निक जोनास या लोकप्रिय जोड्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या नंतर आता चर्चा सुरु झाली आहे, ती वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांच्या लग्नाची. गेल्या कित्येक दिवसांपासून ही जोडी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांच्या लग्नाविषयी अनेक मतमतांतरेदेखील झाले. मात्र आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नासाठी एका खास ठिकाणाची निवड केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वरुण यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नताशासोबत लग्न करणार आहे. त्यातच आता या लग्नासंबंधित एक नवी माहिती समोर आली आहे. वरुण आणि नताशाने लग्नासाठी एका वेडिंग प्लॅनरची निवड केली आहे. त्यासोबतच हे दोघं डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने लग्नासाठी ज्या वेडिंग प्लॅनरची निवड केली होती. त्याच वेडिंग प्लॅनर ‘मोटवाने एंटरटेन्मेंट अॅण्ड वेडिंग’ची निवड वरुण-नताशाने केली आहे. त्यामुळे वरुणच्या लग्नाची तयारी हेच वेडिंग प्लॅनर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वरुणने लग्नासाठी जोधपूरमधील उमेद भवन निवडलं असून त्यांचा शाही विवाहसोहळा येथे रंगणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, आतापर्यंत केवळ या दोघांचं लग्न उमेद भवन येथे होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ऑफिशियल अनाऊंसमेंट झालेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी वरुण धवनच्या वडिलांनी डेविड धवन यांनी वरुणच्या लग्नाची हिंट दिली होती. परंतु, वरुणने या वृत्ताचं खंडन केलं होतं. माझ्या लग्नाविषयी केवळ अफवा पसरत आहेत. मी सतत या गोष्टींना नकार देऊन आता कंटाळलो आहे, असं वरुणने म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button