जेम्स बाँड फेम अभिनेत्री ओल्गा क्युरलेन्कोला कोरोना विषाणूची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-205.png)
टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीनंतर जेम्स बाँड फेम अभिनेत्री ओल्गा क्युरलेन्को हिलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. युक्रेनीयन अभिनेत्री ओल्गा २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बाँडसीरिजमधील चित्रपटात दिसली होती. तिनं इन्स्टाग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे. ४० वर्षीय अभिनेत्री गेले आठवडाभर आजारी होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-17.jpg)
तिला कोरोनाची बाधा झाल्याचं समजताच तिला घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली होती. ताप आणि सर्दी मला झाली होती. चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचं निदान करण्यात आलं आहे. आता प्रत्येकांनी ही बाब गांभीर्यानं घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतील पाहिजे’, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गेल्याच आठवड्यात हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध आणि ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. ते सध्या ऑस्ट्रेलियात असून तिथेच उपचार घेत आहेत.