‘छपाक’ प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी लीक…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-35.png)
अभिनेत्री आणि निर्माती दीपिका पादुकोणसमोरील अडचणींचा पाढा संपताना दिसत नाही. जेएनयूत हजेरी लावल्याने ट्रोलर्सचा सामना करावा लागल्यानंतर दीपिकाच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यात हा सिनेमा कायदेशीर अडचणीतही सापडला होता. आता ‘छपाक’ सिनेमा प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी लीक झाला आहे.
TamilRockers नावाच्या वेबसाइटने दीपिकाचा ‘छपाक’ सिनेमा ऑनलाइन लीक केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, छपाक प्रदर्शित झाला त्याच दिवशी तमीळरॉकर्सवर लीक करण्यात आला होता. आतापर्यंत सिनेमाच्या निर्मात्यांकडून या लीकसंदर्भात कोणतंही अधिकृत निवेदन किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-7.png)
सिनेमा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मरजावां, ड्रीम गर्ल, भारत, कबीर सिंह हे सिनेमेही ऑनलाइन लीक झाले होते. मेघना गुलजारने दिग्दर्शित केलेला छपाक सिनेमा अॅसिड हल्ल्याची बळी असलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या सत्यघटनेवर आधारित आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.