breaking-newsमनोरंजन

चौकशीसाठी सीबीआयने सुशांतचा फोन आणि लॅपटॉप घेतला ताब्यात

मुंबई – सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयची टीम आता कामाला लागली आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याची हत्या झाली की आत्महत्या आहे याविषयी चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून आजपासून सुरू झाला आहे.

या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी सीबीआयकडून दोन विभाग तयार केले आहेत. त्यातील एक टीम वांद्रे पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्यांनी सुशांतची डायरी आणि इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. तसेच सुशांतचा फोन आणि लॅपटॉपही ताब्यात घेतले आहे. यातील एक टीम ही एसपी अनिल यादव लीड करत असून वांद्रे पोलीस ठाण्यात तपास करत आहे. तर दुसरी टीम ही एसपी नुपूर यादव लीड करत आहे. ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करणार आहे.

त्याशिवाय सीबीआयच्या टीमने सुशांतच्या मृत्यूदिवशी घटनास्थळी उपस्थिती असलेल्या सर्व साक्षीदारांना बोलवलं आहे. तसेच सुशांतच्या रुमचा दरवाजा उघणाऱ्या व्यक्तीलाही बोलवण्यात आले आहे.

सद्यस्थितीत सीबीआय टीम शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास करत आहे. सुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी 50 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. हे दस्तावेज सीबीआयच्या टीमकडे देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचीही सीबीआयची टीम भेट घेणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिषेक त्रिमुखे आणि रिया चकवर्ती या दोघांनी वारंवार फोनवर चर्चा केली आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button