चीनमध्ये आमिर खानने केले भारताचे प्रतिनिधीत्व
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/amir_-.jpeg)
बॉलीवूडमधील परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याने चीनमध्ये पार पडलेल्या हॅनन इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवाच्या क्लोजिंग सेरिमनीत भारताचे प्रतिनिधित्व केले. या चित्रपट महोत्सवात जगभरातील दिग्गज कलाकारांसह हॉलिवूड स्टार जॉनी डेपसह जॅकी चैन यांनीही हजेरी लावली होती.
या क्लोजिंग सेरिमनीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी एका व्हिडिओत आमिर खान आणि जॅकी चैन एका डायसवर दिसून येतात. तर दुस-या व्हिडिओत तो जॉनी डेप आणि फ्रेंच अभिनेता ज्यूलियट बिनोच आणि बॉन्ड व्हिलन अभिनेता मॅड्स मिकेलसनसोबत दिसत आहे. अन्य एका फोटोत टर्किश अभिनेत्री-डायरेक्टर नूरी सीलनसोबतही तो महोत्सवात सहभागी होताना दिसत आहे.दरम्यान, आमिर खानचे चीनमध्येही अनेक चाहते आहेत. त्याचा बिग बजेट असलेल्या “दंगल’ चित्रपटाने चीन बॉक्स ऑफीसवर धमाका करत 1,400 कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. याशिवाय त्याच्या “सीक्रेट सुपरस्टार’लाही चीनच्या प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती. सध्या चीनमधील बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडमधील चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.