‘घपा-घप’ आणि विकी कौशल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/vicky-in-sanju.jpg)
‘संजू’ फिल्म परवा शुक्रवारी रिलीज झाल्यापासून फिल्म मधला ‘घपा-घप’ हा कमलेशचा डायलॉग चांगलाच ‘वर्ल्डफेमस’ झालाय… आणि त्यासोबतच फिल्ममध्ये कमलेशच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय करणारा विकी कौशल… तो सुद्धा सगळीकडे ट्रेंड होतोय…त्याच्या तगड्या परफॉर्मन्सचं सगळीकडे कौतुक होतंय…
मसान मध्ये ‘तू किसी रेल सी गुजरती है, मै किसी पूलसा थरथराता हु’ असं म्हणणाऱ्या विकी कौशलने पदार्पणातच आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलं होतं…त्यानंतर रमन राघव 2.0 आणि राझी मध्ये पण विकीने जबरदस्त अभिनय केला. आणि आता ‘संजू’ मध्ये त्याने आणखी एक तगडा परफॉर्मन्स दिलाय. 2016 गुगलने फादर्स डे निमित्त ‘द हिरो- अ बॉलिवूड स्टोरी’ हा 6 मिनिटांचा एक video केला होता. त्यात नंदू माधव यांनी वडिलांची आणि विकी कौशल याने मुलाची भूमिका केली होती. खूप ‘टची’ झाला होता तो video.
विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर आहेत. क्रिश २-३, बजरंगी भाईजान, स्लमडॉग मिलेनियर अशा प्रसिद्ध फिल्म्स साठी त्यांनी ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तर विकीचा भाऊ सनी कौशल याने हा ‘गुंडे’ , मे फ्रेंड पिंटो या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
‘संजू’ बघताना विकी कौशलने साकारलेला कमलेश खूप आवडून जातो… सुनील दत्त – नर्गिस यांचा फॅन ते संजय दत्तचा जिगरी दोस्त हा कमलेशचा प्रवास चांगलाच लक्षात राहतो. ‘संजू’ मुळे विकी कौशलने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय हे मात्र नक्की…