breaking-newsमनोरंजन

गौहर खान करणार “मुजरा’

आपल्या आगामी चित्रपटात एक स्पेशल डान्स करताना अभिनेत्री गौहर खान दिसून येणार असून ती यासाठी फार मेहनत घेताना दिसत आहे. ती एका आगामी चित्रपटात मुजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. गौहर खान या गाण्याच्या स्टेप्स करता जेवढी भरपूर मेहनत करत असून त्याकरता तसेच कपडे आणि दागिने परिधान केले आहेत. या गाण्यात गौहरने 12 किलोचे कपडे परिधान केले असून त्याचबरोबर 3 किलोचे दागिने घातले आहेत. सरोज खान यांनी या गाण्याचे कोरिओग्राफ केले आहे.

गौहरचे म्हणणे आहे की, आमच्याकडे वेळ कमी होती. असे असतानाही मी तयारी केली. भरपूर जड कपडे असल्यामुळे डान्स करताना त्रास होत होता. तसेच माझ्या कोणत्याही छोट्याशा चुकीमुळे सरोज खान नाराज होऊ नयेत असे देखील मला वाटत होते. गौहर खानने गेल्याच वर्षी स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. त्यामध्ये तिने बॉलिवूडमधील चार वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. त्यात “बिग बॉस 7’च्या आठवणीही तिने मांडल्या आहेत. गौहर आणि कुशन टंडन यांच्यात ब्रेक अपच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. मात्र नंतर काही दिवसातच हे दोघे एकत्र दिसले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button