कॅप्टन कूल ‘धोनी’ बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/MS-Dhoni.jpg)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान धोनी आता यापुढे बॉलिवूडमध्ये अभिनय करताना दिसेल असेही म्हटले जात आहे. धोनी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असुन संजय दत्तच्या आगामी चित्रपटात तो अभिनय करताना दिसेल अशी चर्चा आहे.
संजय दत्त डॉगहाऊस या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात सुनील शेट्टी, इमरान हाशमी आणि आर माधवन हे अभिनेते देखील दिसणार आहेत. तसेच जर सर्व काही निर्मात्यांनी ठरवल्या प्रमाणे झाले तर महेंद्र सिंह धोनी देखील या चित्रपटात अभिनय करताना दिसेल. येत्या २९ ऑक्टोंबरला या चित्रपटाची स्टारकास्ट घोषीत केली जाणार आहे.
खर तर धोनीने याआधीच बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे ध्यानचंद यांच्या आयुष्यावर लवकरच एक बायोपिक येत आहे. या चरित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महेंद्र सिंह धोनीने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता धोनी बॉलिवूडमध्ये अभिनय देखील करताना दिसेल असे म्हटले जात आहे.