कुशलला सुरु करायची आहे डॉन बनायचे प्रशिक्षण देणारी संस्था
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-102.png)
मराठी मनोरंजनसृष्टीत त्यातल्या त्यात चला हवा येऊ द्या मध्ये अचूक टाईमिंगसह सर्वांना हसवणारा विनोदवीर म्हणजे सगळ्यांचाच लाडका कुशल बद्रिके. कुशल लवकरच मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे कुशलने आतापर्यंत प्रेक्षकांना हसवले आहे. मात्र या चित्रपटात तो चक्क खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1583499403.jpg)
झोलझाल या चित्रपटातील कुशलच्या भूमिकेचे नाव ‘डॉन दादाऊद कैउद्रे’ असे आहे. या डॉनला सुरु करायची आहे ती म्हणजे डॉन बनायचे प्रशिक्षण देणारी संस्था आणि त्यासाठी त्याला हवाय बंगला. हा बंगला मिळवण्यासाठी कुशल काय झोलझाल करतो? हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांना पहायला मिळेल.
कुशल साकारत असलेला ‘डॉन दादाऊद कैउद्रे’हा अमजद खानचा फॅन असल्याने त्याने परिधान केलेली वेशभूषा अमजद खान यांच्या शोले, कुर्बानी, दादा आणि इन्कार या चित्रपटातील वेषभूषेशी मिळती जुळती आहे. या चित्रपटात कुशलने अमजद खान यांचा आवाज न काढता ,ना त्यांची नक्कल करता एक वेगळाच अमजद खान आपल्या समोर साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
‘झोलझाल’ चित्रपटात कुशल सोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘