breaking-newsमनोरंजन
‘कान्स’च्या रेड कार्पेटवर सोनम अवतरली ब्रायडल लूकमध्ये
अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा आपल्या करिअरकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याची अगदी दणक्याच सुरुवात झालीये, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’साठी गेलेली सोनम परदेशातही तिच्या नववधू रुपात अनेकांचीच मनं जिंकत आहे.
सुरेख अशा एका नव्या रुपात कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. सोनम आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा यांच्या लग्नाला काही दिवस उलटून गेले असले तरीही तिच्यावर असणारा ‘ब्रायडल फिव्हर’ काही केल्या जाण्याचं नाव घेत नाहीये हे तिचा कान्समधील लूक पाहून म्हणावं लागेल.