कानमध्ये ‘मंटो’साठी निराशा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/manto-ll.jpg)
गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा शनिवारी समारोप झाला. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताकडून अधिकृत एंट्री असलेल्या “मंटो’ या सिनेमाला परीक्षकांवर विशेष प्रभाव दाखवता आला नाही. सर्टन रिगार्ड कॅटेगरीमध्ये “मंटो’ला कानमध्ये एंट्री मिळाली होती. या श्रेणीमध्ये “बॉर्डर’सिनेमातला इराणचा अभिनेता अली अब्बासी सर्वोत्कृष्ठ अभिनेता ठरला. “मंटो’ला पुरस्कार मिळाला नाही, याची खंत असली तरी त्या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होते हे ही खरेच आहे. या सिनेमात शहादत हसन मंटो या प्रतिभावान हिंदी लेखकाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती. तर सिनेमाचे डायरेक्शन नंदिता दासने केले आहे.
शॉर्ट फिल्मच्या श्रेणीमध्ये फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटची विद्यार्थिनी पायल कापडियाच्या ‘आफ्टरनून क्लाऊड’लाही एंट्री मिळाली होती. याशिवाय 2017 मधील कोणत्याही सिनेमाला भारताचे प्रतिनिधीत्व करता आलेले नव्हते. अन्य भारतीय कलाकारांच्या सिनेमांपैकी धनुषचा इंग्लिश-फ्रेंच भाषेतील “एक्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’, आसामी फिल्म “व्हिलेज रॉकस्टार’, मल्याळम फिल्म “भयनाकम’, बंगाली फिल्म “नागरकिर्तन’ याशिवाय लक्षद्विपची जसरी भाषेतील फिल्म “सिंजर’ हे देखील या फेस्टिव्हलमध्ये दाखवले गेले.