Breaking-newsमनोरंजन
करण जोहरचं ‘ते’ स्वप्न अद्यापही अपूर्णच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/karan-johar-6.jpg)
प्रत्येक क्षेत्रात निर्माता दिग्दर्शक करण जोहरने अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत आपली वेगळी ओळख कलाविश्वात प्रस्थापित केली. काही तरुण कलाकारांनाही या इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी करणने त्यांच्या करिअरला हातभार लावला. अशा या सेलिब्रिटींच्या लाडक्या ‘केजो’ म्हणजेच करण जोहरचा आज वाढदिवस आहे.
करणचं आयुष्य म्हणजे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या करणची एक इच्छा अद्यापही अपूर्ण आहे. ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालण्याची, त्या व्यासपीठावर ऑस्कर जिंकून इंडिया धिस इज फॉर यू असं म्हणण्याची आपली इच्छा त्याने व्यक्त केली होती.