breaking-newsमनोरंजन

इरफान खानच्या नव्या हॉलिवूड सिनेमाचे पोस्टर रिलीज

‘हिंदी मीडियम’ आणि ‘करीब करीब सिंगल’च्या यशानंतर इरफान आता ‘पझल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या हॉलिवूड चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. इरफानने याही आधी अनेक हॉलिवूड चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

‘पझल’चा ट्रेलर याआधीच रिलीज करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात इरफान स्कॉटिश अभिनेत्री केली मॅक्डोनाल्डसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे कथानक सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असणाऱ्या मॅक्डोनाल्डभोवती फिरते. जी आपल्या रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. अशातच इरफान खान साकारत असलेल्या पात्राबरोबर तिची ओळख होते. हा चित्रपट 13 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

पझलशिवाय इरफानचा ‘कारवां’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने त्याचं पोस्टर आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केलं होतं. दरम्यान, एका दुर्धर आजाराशी लढत असलेला इरफान गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये उपचार घेत आहे. आता चाहत्यांना त्याच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button